...तेव्हापासून किळसवानं राजकारण राज्यात सुरू, एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

“…तेव्हापासून किळसवानं राजकारण राज्यात सुरू”, एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: Jul 14, 2023 | 8:18 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात शिवसेनेसोबत आपली भाजपची भावनिक युती आहे. तर, राष्ट्रवादीसोबत आम्ही पॉलिटिकल मैत्री केली आहे, असं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे.

जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात शिवसेनेसोबत आपली भाजपची भावनिक युती आहे. तर, राष्ट्रवादीसोबत आम्ही पॉलिटिकल मैत्री केली आहे, असं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांची अनेकांशी भावनिक युती झालेली आहे. फडणवीस म्हणतात की, आम्ही आवश्यकता भासल्यास काँग्रेस आणि एमआयएम सोडून कोणाबरोबरही जायला तयार आहोत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सोयीनुसार राजकारण करतात. 2014 नंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले. तेव्हापासून किळसवानं राजकारण राज्यात सुरू आहे. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी इतकं घाणेरडं आणि किळसवानं राजकारण कधीही पाहिलं नव्हतं. आज सुडाचं राजकारण सुरू आहे.”

Published on: Jul 14, 2023 08:18 AM