रावेरच्या अंगणात सासरे विरुद्ध सून, लोकसभेसाठी एकनाथ खडसे, रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार करणार?
सध्या एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेरमधून भाजपच्या तिकिटावर खासदार आहेत. परंतु, एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत गेल्याने महाविकास आघाडीची रावेर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आता खडसेंकडे असणार आहे.
जळगाव : सध्या एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेरमधून भाजपच्या तिकिटावर खासदार आहेत. परंतु, एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत गेल्याने महाविकास आघाडीची रावेर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आता खडसेंकडे असणार आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा आम्ही लढवू असं खडसे म्हटले आहेत. “रावेर लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवली जाणार असून जागावाटपाचा निर्णय अद्याप बाकी असून ज्या पक्षाला ही जागा सुटेल त्याकरिता सर्व घटक पक्ष ही जागा निवडून आणण्याकरिता प्रयत्न करतील,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केला आ्रहे. 2024 च्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नेमकं काय चित्र असणार याबाबत साऱ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे खडसे आपल्या सुनेच्या विरोधात प्रचार करताना पाहायला मिळेल हे आता स्पष्ट झाले आहे.
Published on: Jul 11, 2023 02:43 PM
Latest Videos