जळगावातील राष्ट्रवादीचं कार्यालय नेमकं कोणाचं? पाहा काय म्हणाले एकनाथ खडसे?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. यानंत अजित पवार गटाकडून राज्यातील पक्ष कार्यालयांवर दावे केले जात आहे. नाशिकपाठोपाठ आता जळगावमध्येही मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयावर दावा केला आहे. यावर शरद पवाद गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. यानंत अजित पवार गटाकडून राज्यातील पक्ष कार्यालयांवर दावे केले जात आहे. नाशिकपाठोपाठ आता जळगावमध्येही मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयावर दावा केला आहे. यावर शरद पवाद गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रवादीचे कार्यालय आमच्याच गटाकडे राहणार असल्याचे म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, “जळगावमधील राष्ट्रवादीचे कार्यालय हे ईश्वर बाबू जैन यांच्या नावावर आहे. त्या कार्यालयावर बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे साडेआठ कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज आहे. ईश्वर बाबूजी यांची जळगाव जिल्हाध्यक्षांनी भेट घेतली. यात ईश्वर बाबूजी यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.जोपर्यंत ईश्वर बाबूजी शरद पवार यांच्यासोबत आहेत आणि या कार्यालयावर असलेल्या कर्ज कोणी फेडत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे कार्यालय हे आमच्या गटाकडे राहणार आहे.”