‘गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,’ काय म्हणाले नाथाभाऊ
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या सतत शाब्दीक चकमकी झडत असतात. आता भोसरीच्या भूखंड खरेदीवरुन पुन्हा या दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून याच्या आरोपामुळे जनतेचे मात्र मनोरंजन होत आहे.
भोसरीचा भूखंडबाबत आज चॅनलवर माझ्यावर आरोप केलेत. भूखंड मी घेतलेला नाही. माझी पत्नी आणि जावयाने तो घेतला. त्याचा बाबत शासनाचा जो दर त्यानुसार स्टॅंप ड्यूटी भरलेली आहे. त्याबाबत मी मिटींग घेतली त्यावरुन मला आकसाने ईडी लावली. मिटींग घेणे म्हणजे काही गुन्हा नाही. ते पुढे कोर्टात स्पष्ट होईल. आजही तुम्ही उतारा काढू शकता मूळ मालकाचे नावच त्यावर दिसेल. इतर हक्कात एमआयडीसीचे नाव आहे. इतर हक्कात नाव असताना खरेदी करता येत नाही असे कोणताही नियम नाही. महसूल मंत्री म्हणून तेवढी अक्कल मला होती असे भाजपाचे माजी मंत्री नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन यांनी भूखंडासंदर्भात दिलेली माहिती अत्यंत चुकीची आहे.आता म्हणता बोदवडमध्ये पाणी नाही. ती जबाबदारी माझी नाही, तुमच्या आमदाराची आहे.पाच वर्षे काय करतोय तुमचा आमदार ? गिरीशभाऊंना कसलंही व्यसन नाही, ते गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय ती तुम्हालाही माहिती आहे. त्याबाबत न बोललेलंच बरं असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.