Eknath Khadse | झोटिंग कमिटीचा खळबळजनक अहवाल, क्लीन चीट नसल्याची सूत्रांची माहिती, खडसेंच्या अडचणी वाढणार?

| Updated on: Jul 14, 2021 | 11:44 AM

झोटिंग कमिटीचा खळबळजनक अहवाल आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात खडसेंना क्लीन चीट नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे खडसेंच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातंय.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणाची चौकशी करणारा झोटिंग समितीचा (Zoting Committee) गायब झालेला अहवाल सापडला आहे. दरम्यान, झोटिंग समितीच्या अहवालात एकनाथ खडसे यांच्यावर मोठे आरोप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोसरी एमआयडीसीतल्या जमीन खरेदी प्रकरणात खडसेंना क्लीन चीट नव्हती, खडसेंनी गोपनियतेच्या शपथेचा भंग केला, मंत्रिपदाचा वापर करुन पत्नी आणि जावयाला फायदा होईल असे निर्णय घेतले, असे निष्कर्ष झोटिंग समितीने काढले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Eknath Khadse Zoting Committee report)

Published on: Jul 14, 2021 11:44 AM
Nana Patole LIVE | 2024 मध्ये राज्यात कॉंग्रेस एक नंबरचा पक्ष असेल : नाना पटोले
Parbhani | परभणीच्या सोनपेठतील घटना, पुलावर आलेल्या पाण्यात दुचाकी चालवणं अंगलट