केसरकर यांच्या दाव्यावर राऊत यांचा षटकार; केली कोणती मागणी?

केसरकर यांच्या दाव्यावर राऊत यांचा षटकार; केली कोणती मागणी?

| Updated on: Jun 21, 2023 | 10:30 AM

राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत दावा करणाऱ्या केसरकर यांना आधी पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे असं म्हटलं आहे. तर पत्रकारांनी जेंव्हा राऊत यांना हा प्रश्न विचारला तेंव्हा त्यांनी बापरे अशी रिअॅक्शन देताना आधी केसरकर यांनी पोलीसांनी ताब्यात घेतलं पाहिजे.

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतील 50 आमदार गेले. मात्र तो बंड यशस्वी झाला नसता तर असं म्हणत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी जर उठाव यशस्वी झाला नसता तर शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, असा दावा केला. त्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसरकर यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी पोलीस प्रशासनाला आवाहन देखील केलं आहे. राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत दावा करणाऱ्या केसरकर यांना आधी पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे असं म्हटलं आहे. तर पत्रकारांनी जेंव्हा राऊत यांना हा प्रश्न विचारला तेंव्हा त्यांनी बापरे अशी रिअॅक्शन देताना आधी केसरकर यांनी पोलीसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. कारण एखादा आत्महत्या करण्याचा विचार करतोय आणि ते या केसरकर यांना माहित आहे. जर घटनेला स्मरून तसं झाल तर… त्यामुळं असं त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 21, 2023 10:30 AM