“मृतदेहाच्या बॅगचे पैसे खाण्यापेक्षा मोठं पाप कोणतं?”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्या आरोपांखाली सध्या ईडीची चौकशी सुरू आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांपासून तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांची चौकशी ईडी करत आहे. या प्रकरणात ठाकरे कुटुंबीयांचे नाव घेतले जाऊ लागल्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्या आरोपांखाली सध्या ईडीची चौकशी सुरू आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांपासून तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांची चौकशी ईडी करत आहे. या प्रकरणात ठाकरे कुटुंबीयांचे नाव घेतले जाऊ लागल्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “तुम्ही जर मुंबई महापालिकेची चौकशी करत असाल तर नक्की करा, पण त्याचबरोबर ठाणे महापालिकेचीही चौकशी करा.” याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. “कोरोनासारखा भयंकर आजार होता, तिथे लोकं मरत होती आणि इथे ही लोकं पैसे खात होते. ‘मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणे’ हे काय चांगलं आहे? एका मृतदेहाच्या बॅगचे पैसे खाण्यापेक्षा मोठं पाप कोणतं असू शकतं?” असं शिंदे म्हणाले.
Published on: Jun 25, 2023 02:34 PM
Latest Videos