Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा गोंदली छातीवर, व्हिडीओ व्हायरल

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा गोंदली छातीवर, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Aug 29, 2022 | 10:21 PM

पंढरपूर येथील बालाजी भांडे या तरुणानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा छातीवर गोंदली आहे. बालाजी हा टेंभूर्णी येथील एका पेट्रोल पंपावर काम करतो. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

सोलापूर : शिवसेना (Shiv sena) कुणाची यावरुन‌ सध्या माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात घमासान सुरू आहे. अशातच आता कार्यकर्ते देखील आपल्या नेत्यांप्रति असलेली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. अशातच पंढरपूर येथील बालाजी भांडे या तरुणानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा छातीवर गोंदली आहे. बालाजी हा टेंभूर्णी येथील एका पेट्रोल पंपावर काम करतो. त्यानं काढलेल्या प्रतिमेचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. यापूर्वी सोलापूरचे शिवसैनिक रामण्णा जमादारांनी पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि  माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा टॅटू काढला आहे. या दोन्ही टॅटूंची चांगलीच चर्चा आहे. अशा प्रकारे नेत्यांचे टॅटू काढून कार्यकर्ते नेत्यांप्रति असलेली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

Published on: Aug 29, 2022 10:21 PM