घरात बसून काहीच होत नाही; एकनाथ शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला

घरात बसून काहीच होत नाही; एकनाथ शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला

| Updated on: Sep 18, 2022 | 1:02 PM

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर सातत्याने शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमध्ये खटके उडत असल्याचं पहायाला मिळत आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडल्यानंतर सातत्याने शिंदे गट आणि शिवसेना (Shiv sena) नेत्यांमध्ये खटके उडत असल्याचं पहायाला मिळत आहे. दोन्हीकडून एकोंमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. घरात बसून काहीच होत नाही, आसा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे.  पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं  असतं. मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यांनी चित्ता भारतात आणला मग यांना चित्ते सरकार म्हणायचं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Sep 18, 2022 01:02 PM