Eknath Khadse Video : हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे! एकनाथ खडसेंची टीका, पाहा व्हिडीओ
ता घरोघरी पोहचली असल्याचं म्हणत राज्यातील ईडी कारवायांवरही त्यांनी निशाणा साधला.
जळगाव : आडवं उभी काहीतरी स्टोरी रचायची आणि अडकवण्याचा प्रयत्न करतायचा, असं म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ईडी (ED), सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या वापरावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. ते जळगावात (Jalgaon Policei) एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान, बोलत होते. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तिखट शब्दांत टीका केली. तसंच ‘हम तो डुंबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगेट असं म्हणत थेट विरोधकांना इशाराही दिलाय. यावेळी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. तसंच ईडी आता घरोघरी पोहचली असल्याचं म्हणत राज्यातील ईडी कारवायांवरही त्यांनी निशाणा साधला. दरम्यान, भाजपच्या 50 आमदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याचीही शक्यता त्यांनी वर्तवलीय. शिंदे गट आणि फडणवीस सरकारमध्ये भानगडी होणारच आहेत, असंही त्यांनी म्हटलं.