एकनाथ शिंदेंनी आमदारांवर जादूटोणा केला- चंद्रकांत खैरे

| Updated on: Jun 27, 2022 | 4:53 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी आमदारांवर जादूटोणा केल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हे जादूटोणा करणारे आहेत, ते कायम तोंडात काहीतरी चघळत असतात असेही खैरे म्हणाले. गुवाहाटी येथे त्यांनी आमदारांना जादूटोणा करून गुंडाळून ठेवले असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला […]

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी आमदारांवर जादूटोणा केल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हे जादूटोणा करणारे आहेत, ते कायम तोंडात काहीतरी चघळत असतात असेही खैरे म्हणाले. गुवाहाटी येथे त्यांनी आमदारांना जादूटोणा करून गुंडाळून ठेवले असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी कार्यकर्त्यांना न घाबरण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे शिंदे गटाने सरकारचा पाठींबा काढल्याने सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट हा वाद दिवसंदिवस चिघळत चालला आहे.

 

Published on: Jun 27, 2022 04:53 PM