Special Report |  एकनाथ शिंदे गट की उद्धव ठाकरे? पुढच्या निवडणुकीत धनुष्यबाण कुणाला मिळणार?

Special Report | एकनाथ शिंदे गट की उद्धव ठाकरे? पुढच्या निवडणुकीत धनुष्यबाण कुणाला मिळणार?

| Updated on: Jul 24, 2022 | 9:29 PM

दोन्ही गटांना 27 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानंही शिवसेना आणि शिंदे गटाला 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ,लोकसभेबरोबरच शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार , शिवसेनेचे नेते, प्रवक्ते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख आणि शाखा प्रमुखांपर्यंत शिवसेनेत फूट पडल्याचं सिद्ध करावं लागेल 

मुंबई : कार्यकर्त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेत एकनिष्ठतेची शपथ घेतली जायची. त्याच शिवसेनेत आता कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र भरुन घेतलं जातंय. खरी शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे(Eknath Shinde ) गटानं केलाय. ही लढाई आता सुप्रीम कोर्टातही गेलीय. निवडणूक आयोगाकडेही आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटानं केलाय. धनुष्यबाण कुणाचा? शिवसेना कुणाची याचा फैसला आता निवडणूक आयोगात होणार आहे. हे सिद्ध करण्यासाठीच उद्धव ठाकरेंकडून(Uddhav Thackeray) शिवसेना कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातंय. आज नाशिक आणि पुण्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. नाशिकमधल्या 36 नगरसेवकांनी आपण शिवसेनेसोबत एकनिष्ठ असल्याचं प्रतिज्ञापत्र लिहून दिलंय. सिंधुदुर्गातही शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्राची मोहीम सुरु करण्यात आलीय. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय
दोन्ही गटांना 27 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानंही शिवसेना आणि शिंदे गटाला 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ,लोकसभेबरोबरच शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार , शिवसेनेचे नेते, प्रवक्ते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख आणि शाखा प्रमुखांपर्यंत शिवसेनेत फूट पडल्याचं सिद्ध करावं लागेल.
येत्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याकडेच राहावं यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरु आहेत.. त्यासाठीच दोन्ही बाजूंकडून प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याची मोहीम सुरु झालीय.

Published on: Jul 24, 2022 09:29 PM