बाळासाहेबही बोलले होते..., प्रकाश आंबेडकर यांचा तो सल्ला योग्यच!, नेमकं काय बोलले एकनाथ शिंदे?

“बाळासाहेबही बोलले होते…, प्रकाश आंबेडकर यांचा तो सल्ला योग्यच!, नेमकं काय बोलले एकनाथ शिंदे?

| Updated on: Aug 03, 2023 | 2:48 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सावधतेचा इशारा दिला आहे. "नाना पटोलेंच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती पाहून ताबडतोब ठाकरे गटानं निर्णय घेतला तर अधिक चांगलं आहे”, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला. आंबेडकर यांच्या या विधानावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.

रत्नागिरी: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सावधतेचा इशारा दिला आहे. “नाना पटोलेंच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती पाहून ताबडतोब ठाकरे गटानं निर्णय घेतला तर अधिक चांगलं आहे”, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला. आंबेडकर यांच्या या विधानावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला बरोबर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवा, असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होतं. त्यामुळे त्यांना जवळ केल्याने आम्हाला तेथून दूर जावं लागलं. बाळासाहेब आंबेडकर यांची सूचना योग्य आहे. त्यांनी चांगला सल्ला दिलेला आहे”, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

 

Published on: May 25, 2023 04:13 PM