“उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट संपली, त्यांना कामाने शह देणार”, एकनाथ शिंदे यांची टीका
गतवर्षी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात शिंदे-फडणवीस यांचं युतीचं सरकार स्थापन केलं. यासंपूर्ण घटनेनंतर महाराष्ट्रात सत्तानाट्याला सुरुवात झाली. शिवसेनेचे दोन गट पडून निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. राज्याच्या सत्तासंघर्षाची लढाई ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली.
नवी दिल्ली : गतवर्षी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात शिंदे-फडणवीस यांचं युतीचं सरकार स्थापन केलं. यासंपूर्ण घटनेनंतर महाराष्ट्रात सत्तानाट्याला सुरुवात झाली. शिवसेनेचे दोन गट पडून निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. राज्याच्या सत्तासंघर्षाची लढाई ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. यावरून एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी, उद्धव ठाकरे यांची सहानुभूतीची लाट राहिली नाही, त्यांना कामाने शह देऊ, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केलं आहे.उद्धव ठाकरे यांच्या मनात माझ्याबद्दल खूप द्वेष आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला निवडणुकीत चांगलं यश मिळेल, अस एकनाथ शिंदे म्हणाले.
Published on: May 27, 2023 04:25 PM
Latest Videos