Eknath Shinde | मुख्यमंत्री होणं अनपेक्षित होतं
लोकांमध्ये भाजपबाबत एक विचार होता की भाजप तोडफोड करतेय, स्वत:ला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून. पण सगळ्यांचा दावा त्यांनी खोटा ठरवला. त्यांच्याकडे संख्याबळ असूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला. यातून एक उदाहरण, एक मिसाल देशाला मिळेल.
मुंबई : मी आतापर्यंत अपेक्षा ठेवून काम केलं नाही. जी जी संधी मिळाली ती माझ्या केलेल्या कामांमुळे, मिळालेल्या संधीचं मी नक्कीच सोनं केली पक्षासाठी, शिवसेनेसाठी. आज सर्वोच्च पद जे मिळालं आहे त्याबाबत मी आनंद व्यक्त करतो, समाधानही व्यक्त करतो. मलाही हे अनपेक्षित होतं. परंतु लोकांमध्ये भाजपबाबत एक विचार होता की भाजप तोडफोड करतेय, स्वत:ला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून. पण सगळ्यांचा दावा त्यांनी खोटा ठरवला. त्यांच्याकडे संख्याबळ असूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला. यातून एक उदाहरण, एक मिसाल देशाला मिळेल.
Published on: Jul 02, 2022 01:32 AM
Latest Videos