Eknath Shinde, CM Fellowship : शिंदे सरकार 100 दिवसांचं संकल्पपत्र आणणार, मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू होणार

Eknath Shinde, CM Fellowship : शिंदे सरकार 100 दिवसांचं संकल्पपत्र आणणार, मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू होणार

| Updated on: Jul 21, 2022 | 11:57 AM

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री फेलोशिप हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. तो पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुरू होणार असल्याचं दिसतंय. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकेल.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याच्या विकासासाठी तातडीची पाऊलं उचलत असल्याचं दिसंतय. आता शिंदे-फडणवीस सरकार हे शंभर दिवसांचं संकल्पपत्र आणणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भात सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या (State Government of Maharashtra) विकासकामांना गती देण्यासाठी एक संकल्पपत्र तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागप्रमुखांना एक पत्र पाठवलं आहे. शंभर दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या विभागाच्या कुठल्या कामांचा, योजनांचा समावेश करायचा, या बाबत सूचना,प्रस्ताव पाठवा,असं आदेशित करण्यात आलंय. मुख्यमंत्री फेलोशिप (CM Fellowship) पुन्हा सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री फेलोशिप हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला होता. तो आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुरू होणार असल्याचं दिसतंय. ही फेलोशिप म्हणजे चार-पाच जणांच्या एका गटाकडे एक सरकारी विभाग दिला जायचा. त्या विभागातील योजनांना गती देणे, त्या फॉलोअप, नवीन कल्पना सुचविणे हे कामं तरुणाई करायची.

Published on: Jul 21, 2022 11:57 AM