Aditya Thackeray यांच्या दौऱ्यावर Chandrashekhar Bawankule यांचा टोला – tv9
आदित्य ठाकरे यांच्या याच दौऱ्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. तसेच बावनकुळे म्हणाले, ही गर्दी म्हणजे फक्त कांगावा आहे.
शिवसेना सत्तेबाहेर करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. त्यांच्या या कामात शिवसेनेच्याच अनेक आमदारांचा हात आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभर शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून दौरे सुरू केले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या याच दौऱ्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. तसेच बावनकुळे म्हणाले, ही गर्दी म्हणजे फक्त कांगावा आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे होतं. स्वतः आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते. या अडीच वर्षात तुम्ही काय केलं असा प्रश्नही चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे. तर यावेळी दौरे, आंदोलने करून काहीही साध्य होणार नसल्याचं ही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच आता पुलाखालून बरोच पाणी निघून गेलेलं आहे. तुम्ही कितीही दौरे केले तरीदेखील तो फक्त एक रोडशो असेल असा घनाघात बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरून केलेले आहे.