‘अबू आझमी हा धार्मिक माणूस अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका

‘अबू आझमी हा धार्मिक माणूस अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका

| Updated on: Apr 08, 2025 | 3:40 PM

औरंगजेबाची कबर आणि कुणाल कामरा प्रकऱणावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. बघा काय म्हणाले संजय शिरसाट?

अबू आझमी खूप धार्मिक माणूस आहे, असा खोचक टोला लगावत अबू आझमी ही औरंगजेबाची छटी औलाद असल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. तर अबू आझमी यांनी औरंगेजबावर खूप प्रेम येतं, त्यांनी त्याचं गुणगान गावं आणि इतकंच प्रेम येत असेल कर अबू आझमी यांनी औरंगजेबाची कबर उचलावी आणि त्यांच्या घरी न्यावी, असंही संजय शिरसाट म्हणाले. ज्या औरंगजेबाने आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अत्याचार केलेत, आमच्या धार्मिक मंदिरांवर आणि महिलांवर अत्याचार केलेत अशा औरंगजेबाची कोणतीही निशाणी आम्हाला महाराष्ट्रात नको, असं म्हणत संजय शिरसाट यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून संताप व्यक्त केला. यासह त्यांनी कुणाल कामरावरही भाष्य केलेय. ‘कोणत्या गोष्टीची कुणाल कामराला भिती? लोकांचे कपडे उतरवण्याची भाषा करतो, लोकांना गद्दार म्हणतो. कुणाल कामरा जेव्हाही मुंबईत येईल त्यावेळेला त्याला तसंच उत्तर दिलं जाईल. त्यांचं स्वागत तर करावचं लागेल.’, असा इशारा संजय शिरसाट कुणाल कामराला दिला. तर कुणाल कामराला कायद्यानुसार नक्की शिक्षा मिळेल, असंही संजय शिरसाट म्हणाले.

Published on: Apr 08, 2025 03:40 PM