राज्यात सत्ताबदल निश्चित, एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत युती करावी - आठवले

राज्यात सत्ताबदल निश्चित, एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत युती करावी – आठवले

| Updated on: Jun 23, 2022 | 9:39 AM

राज्यात सत्ताबदल होणार असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करावी असा सल्ला देखील आठवले यांनी यावेळी दिला आहे.

राज्यात सत्ताबदल होणार असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले आहे. मात्र त्यांना शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाला. आता एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत येऊन सत्ता स्थापन करावी. भविष्यात एकनाथ शिंदेंसोबत जे आमदार आहेत तीच खरी शिवसेना असल्याचे चित्र निर्माण होणार असल्याचे देखील रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Published on: Jun 23, 2022 09:39 AM