Eknath Shinde Supporters | डोंबिवलीत एकनाथ शिंदे समर्थकांची बॅनरबाजी

| Updated on: Jun 23, 2022 | 12:31 AM

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे वर्चस्व असून एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण डोंबिवलीत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या गोटात शांतता असली तरी आज शिंदे समर्थकांकडून डोंबिवली-कल्याण शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली. 

डोंबिवली : शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला तर दुसरीकडे शिंदे समर्थकांमध्ये भर पडत असल्याचे चित्र दिसून येतंय. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे वर्चस्व असून एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण डोंबिवलीत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या गोटात शांतता असली तरी आज शिंदे समर्थकांकडून डोंबिवली-कल्याण शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली.

Published on: Jun 23, 2022 12:31 AM