…तर पळता भुई थोडी होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

“…तर पळता भुई थोडी होईल,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

| Updated on: Jul 14, 2023 | 8:32 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारपासून महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला ठाण्यापासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांची काल ठाण्यात जोरदार सभा पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारपासून महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला ठाण्यापासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांची काल ठाण्यात जोरदार सभा पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “बाळासाहेब, हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवले, ज्या मतदारांनी निवडून दिलं, बहुमत दिलं, त्यांच्याशी दगाबाजी कुणी केली? आम्हीसुद्धा बोलू शकतो. आम्हालाही बोलता येतं. पण बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची संस्कृती आणि परंपरा आहे. त्यांनी काही गोष्टी शिकवल्या. आम्ही मर्यादा सोडून बोलत नाहीत याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असं मानू नका. आमच्याकडे सगळं आहे. पण अजून ठेवलं आहे. काढायला लागलो तर पळता भुई थोडी होईल. तोंड लपवायला लागेल.”

Published on: Jul 14, 2023 08:32 AM