एकनाथ शिंदेंचा गुजरातला जाण्याचा प्लॅन कालच ठरला?
एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचा गुजरातला जाण्याचा प्लॅन कालच ठरला होता, अशी माहिती टीव्ही 9 ला सुत्रांकडून मिळत आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांनी सूरतच्या ली-मेरिडिअन हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. हॉटेलबाहेर तगडा पोलीसबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचा गुजरातला जाण्याचा प्लॅन कालच ठरला होता, अशी माहिती टीव्ही 9 ला सुत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तेरा आमदार असल्याने र्तक वितर्कांना उधान आले आहे.
Published on: Jun 21, 2022 09:57 AM
Latest Videos