गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांनी गणरायाला घातले साकडे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायाच्या चरणी राज्याला चांगले दिन येण्याची आणि सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्याची मागणी केली आहे. त्यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली शेती होऊन राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिन येवो असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायाला घातले आहे. काही ठिकाणी जादा पाऊस पडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील गेली दोन वर्षे विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातली आहे. मुंबईतील सागरी सेतू आणि मेट्रो मार्ग आणि इतर प्रकल्प त्याची उदाहरणे त्याची साक्ष आहे. त्यामुळे सर्वांना सुबुद्धी मिळो आणि सर्वांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळो अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Published on: Sep 07, 2024 01:26 PM
Latest Videos