एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
मुख्यमंत्री पदावरुन एकनाथ शिंदे यांनी दावा ठोकल्याने महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल येऊन चार दिवस झाले तरी सरकार स्थानापन्न झालेले नाही. मात्र आज पत्रकार परिषदत घेत एकनाथ शिंदे यांनी अखेर माघार घेतली. त्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन वाद सुरु असताना आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रातील नेते यांना सरकार स्थापण करण्यात आपला कोणताही अडथळा नसेल ते जो निर्णय घेतील तो भाजपाप्रमाणे आम्हाला देखील मान्य असेल असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर करीत आपली मुख्यमंत्री पदाची मागणी सोडून दिली आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले आहेत ते विरोध करणार या विरोधकांच्या केवळ वावड्याच ठरल्या आहेत. महायुतीचे एकनाथ शिंदे अत्यंत ज्येष्ठ नेते आहे त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो असेही शिंदे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या हिताची आहे. त्यामुळे विकसित भारताचे आपले स्वप्न पूर्ण होणार आहे.त्यामुळे एनडीएला ताकद मिळणार आहे असेही बावनकुळे यांनी सांगितले.