ShivSena Anniversary : शिवसेनेचा वर्धापनदिन; बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून वर्धापनाचा टिझर लॉन्च
भाजपसोबत जात राज्यात सत्ता आणली. तर खरी शिवसेना आमचीच म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनावर हक्क सांगितला. तर शिवसेना निवडणूक आयोगाकडून घेतलीही. त्या बंडखोरीनंतर पहिलाच वर्धापन दिन तर शिवसेनेचा 57वा 19 जून रोजी साजरा होणार आहे.
मुंबई : शिवसेनेत सर्वात मोठी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट धरली. तसेच भाजपसोबत जात राज्यात सत्ता आणली. तर खरी शिवसेना आमचीच म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनावर हक्क सांगितला. तर शिवसेना निवडणूक आयोगाकडून घेतलीही. त्या बंडखोरीनंतर पहिलाच वर्धापन दिन तर शिवसेनेचा 57वा 19 जून रोजी साजरा होणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्धापन दिनाचा कार्यक्रम जाहीर केला असून गोरेगाव इथल्या नेक्से एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच्या आधी आता याच वर्धापन दिनाचा टीझर शिवसेनेने रिलीज केला आहे. या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत.
Published on: Jun 17, 2023 09:24 AM
Latest Videos