निवडणूक कायद्यात बदल, मुख्य निवडणूक अधिकारी

निवडणूक कायद्यात बदल, मुख्य निवडणूक अधिकारी

| Updated on: Jul 25, 2022 | 8:17 PM

निवडणूक कायद्यात अलीकडे काही बदल झाले आहे, हे सर्व बदल 1 ऑगस्ट 22 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात येणार असून एप्रिल 2023 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितली. यावेळी त्यांनी सांगितले की, मतदारानी दिलेली माहिती योग्य देणं महत्वाचं आहे, याची गोपनीयता कोणी भंग केली तर त्याला […]

निवडणूक कायद्यात अलीकडे काही बदल झाले आहे, हे सर्व बदल 1 ऑगस्ट 22 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात येणार असून एप्रिल 2023 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितली. यावेळी त्यांनी सांगितले की, मतदारानी दिलेली माहिती योग्य देणं महत्वाचं आहे, याची गोपनीयता कोणी भंग केली तर त्याला शिक्षा होणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी सांगितले की, हे कायद्याचं कठोर बंधन आणि निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांनाही लागू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आधार तयार करणाऱ्या एजन्सीला विशेष महत्व देण्यात आले असून नोंदणी/बदल सुविधा ऑनलाइनसुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Published on: Jul 25, 2022 08:17 PM