सुषमा अंधारे यांचे शिवाजी महाराज यांना भावनिक पत्र, म्हणाल्या, पुन्हा कधी असा अधर्म…
मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाघाचे कातडे पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय.
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांना एक भावनिक पात्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे, ‘आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज ! आम्हाला माफ करा. आज तुमच्या जन्मदिनी स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाघाचे कातडे पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय. तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय असे कधी घडले नाही. पण, यापुढे कधी असा अधर्म आम्ही होऊ देणार नाही असे वचन आम्ही तुम्हाला देतो. शिवश्रद्धा आणि शिवनिष्ठा मनी आहेच. फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या. स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या आणि अधर्म युद्धात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या. हर हर महादेव, तुमचा सच्चा शिवसैनिक’.