नाशकात मनपा कारवाईला वेग; शालिमार परिसरात सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम
शहरातील शालिमार परिसरात महापालिकेची सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबण्यात येत आहे. आज पहाटेपासून अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू झाली असून तेथे बुल्डोझर फिरवला जात आहे.
नाशिक : अतिक्रमणावर फक्त उत्तर प्रदेशमध्येच बुल्डोझर चालत नाही तर आता माहाराष्ट्रातही चालतो. अनेक ठिकाणी अनेक महापालिकांनी आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमणांवर धडक मोहिम आखल्या आणि त्या तडिस नेत अतिक्रमणे जमिनदोस्त केली आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू झाली आणि एक लाख चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम काढली गेली. ही कारवाई तीन दिवसापासून सुरू होती. आता अशीच कारवाई नाशिकरांना बघायला मिळत आहे. शहरातील शालिमार परिसरात महापालिकेची सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबण्यात येत आहे. आज पहाटेपासून अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू झाली असून तेथे बुल्डोझर फिरवला जात आहे. शालिमार परिसरातील शिवसेना कार्यालया शेजारी असलेले अनधिकृत गाळे हटविण्याचे काम सुरू असून यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर हे अनधिकृत गाळ्यांसदर्भात अनेक वर्षांपासून तक्रारी येत होत्या. पण देर आए दुरूस्त आए अशीच काहीशी चर्चा परिसरात सुरू आहे.