मी कॉंग्रेस सोडेन असे कधी वाटले नव्हते, माझ्यासाठी भावूक क्षण, मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रीया
एकनाथ शिंदे हे जमीनीवरचे नेते आहेत. ते सतत लोकांना उपलब्ध असतात. त्याचं महाराष्ट्राबद्दलचं मोठं व्हीजन आहे. त्यामुळे त्याचं हात मजबूज करण्यासाठी आपण शिवसेने प्रवेश केल्याचे मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश करताना म्हटले आहे. आपण कधी कॉंग्रेस सोडू असे वाटले नव्हते. कॉंग्रेस अडचणीत असतानाही आपल लॉयल राहीलो. परंतू आपल्या वडीलांच्या वेळेची आणि आपण 2004 मध्ये पद स्वीकारले त्यावेळेची आणि आताची कॉंग्रेस वेगळी आहे अशी टीकाही मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करताना केली आहे.
मुंबई | 14 जानेवारी 24 : कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात आज अखेर प्रवेश केला. त्यांनी कॉंग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं असे भावूक विधान केले आहे. आज आपण आपल्या कुटुंबाचे कॉंग्रेसशी असलेले गेल्या 55 वर्षांचं नातं आपण संपवित असल्याचे म्हटले आहे. आपलं राजकारण अत्यंत सकारात्क आणि विकासाचं राहीलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने महाराष्ट्रातील सर्वांना एक्सेसेबल असलेला आणि जमिनीवरचा नेता लाभलेला आहे. त्याचं महाराष्ट्राबद्दलचं व्हीजन मोठे आहे आणि मोदी तसेच शाह यांच्याकडे देशासाठी मोठे व्हीजन म्हणून मला त्यांचे हात बळकट करायचे असल्याचे मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हटले आहे. आजची कॉंग्रेस आणि माझे स्वर्गीय वडील ज्यावेळी कॉंग्रेसमध्ये होतो ती कॉंग्रेस वेगळी आहे. माझे वडील मुरलीभाई बाळासाहेबांच्या आशीर्वादाने महापौर झाले. मेरीट आणि योग्यतेला कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महत्व दिले असते तर आज मी आणि एकनाथ शिंदे आज येथे नसतो असेही त्यांनी म्हटले आहे.