Aslam Sheikh : माजी मंत्री अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाची नोटीस
माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh ) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मढमधील कथित स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मढमधील कथित स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे आदेश देखील पर्यावरण विभागाने दिले आहेत. दरम्यान याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाने नोटीस बजावली आहे. आता या बांधकामावर केव्हा कारवाई होणार यांच्या प्रतिक्षेत आपण असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
Latest Videos