Beed : रस्ता नसलेले गाव, निर्मळवाडी नाव पण सुविधांचा अभाव
स्वातंत्र्याच्या 75 वर्षात या गावाला साधा रस्ताही झालेला नाही. त्यामुळे बस आणि वाहने तर सोडाच पण आजही येथील ग्रामस्थांना पायी गाव जवळ करावे लागत आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी येथील गावकऱ्यांनी प्रशासन दरबारी अनेक वेळा खेटे मारले आहेत. असे असतानाताही रस्त्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. प्रशासनाने याकडे सपशेल डोळेझाक केली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतर का होईना या गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी होत आहे
बीड : सध्या सबंध देशात अमृत महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. गेल्या 75 वर्षामध्ये देशाने केलेली प्रगती दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असताना दुसरी बाजूही समोर येणे गरजेचे आहे. देशातील ग्रामीण भागात आजही मुलभू सोई-सुविधांचा पुरवठा झालेला नाही. असेच एक बीड तालुक्यातील गाव आहे. राज्य मार्गापासून अवघ्या 6 किमी अंतरावर निर्मळवाडी हे गाव वसलेले आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात या गावाला साधा रस्ताही झालेला नाही. त्यामुळे बस आणि वाहने तर सोडाच पण आजही येथील ग्रामस्थांना पायी गाव जवळ करावे लागत आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी येथील गावकऱ्यांनी प्रशासन दरबारी अनेक वेळा खेटे मारले आहेत. असे असतानाताही रस्त्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. प्रशासनाने याकडे सपशेल डोळेझाक केली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतर का होईना या गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी होत आहे