Special Report | Disha Salian च्या मृत्यूवरुन 7 मार्चला सगळे पुरावे समोर येतील ?

Special Report | Disha Salian च्या मृत्यूवरुन 7 मार्चला सगळे पुरावे समोर येतील ?

| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 9:11 PM

दिशा सालियानचे हा वाद सुरु असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 7 मार्च नंतर दिशा सालियान प्रकरणाचा उलगडा करुन सर्व पुरावे सादर करणार असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

कोल्हापूरः भाजप-शिवसेनेचा (BJP-SHIVSENA) आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चालू असतानाच आता दिशा सालियान (Disha Saliyan) प्रकरणाने आाता पुन्हा उचल खाल्ली आहे. दिशा सालियानविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) वक्तव्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दिशा सालियानचे हा वाद सुरु असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 7 मार्च नंतर दिशा सालियान प्रकरणाचा उलगडा करुन सर्व पुरावे सादर करणार असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.