18 खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएमचा विसर पडला होता का? शिवसेना नेत्याचा राऊतांना प्रश्न
शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी टीकेणंच उत्तर दिलं. मागच्या वेळेला जेव्हा 18 खासदार शिवसेनेचे निवडून आले तेव्हां त्यांना ईव्हीएमचा प्रश्न पडला नाही का?
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमला विरोध करताना भाजपच्या विजयाचं रहस्य ईव्हीएममध्ये असल्याचे म्हटलं आहे. तर बांगलादेशात विरोधी पक्षाच्या मागणीवरून ईव्हीएम रद्द केलं. ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. विरोधकांनी आक्षेप घेताच तिथल्या राष्ट्रप्रमुखांनी ईव्हीएम रद्द केल्या. हे आपल्या राज्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावरून त्यावर शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी टीकेणंच उत्तर दिलं. मागच्या वेळेला जेव्हा 18 खासदार शिवसेनेचे निवडून आले तेव्हां त्यांना ईव्हीएमचा प्रश्न पडला नाही का? आता त्यांना जाग कशी आली? ते रात्रभर झोपत नाही, काही विचार करत बसतात आणि सकाळी सांगत असतात. एवढं काय मनावर घ्यायची गरज नाही. आता हे हळूहळू लोकांनाही कळायला लागलेला आहे. तर ईव्हीएमचा प्रश्न महाराष्ट्रात काय येणार नाही असेही गोगावले यांनी म्हटलं आहे.