… म्हणून हे सरकार म्हात्रे-सुर्वे प्रकरणाचा उपयोग करतयं; आव्हाडांचा आरोप
राज्य शासनाने म्हात्रे-सुर्वे प्रकरणांमध्ये एसआयटी नेमली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हात्रे-सुर्वे प्रकरणांमध्ये एसआयटी नेमली आहेत चांगली गोष्ट असल्याचे म्हटलं आहे.
मुंबई : मुंबईतील माजी नगरसेविका आणि शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांच्या एका आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापलेलं आहे. व्हीडिओ मॉर्फ करून वापरल्याच्या आरोपानंतर उद्धव ठाकरे गटाच्या दोघांना अटक करण्यात आली. तसेच याप्रकरणी राज्य शासनाने एसआयटी नेमली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हात्रे-सुर्वे प्रकरणांमध्ये एसआयटी नेमली आहेत चांगली गोष्ट असल्याचे म्हटलं आहे. मात्र तपासाच्या आधीच रात्री बे रात्री पोरांच्या घरी जाऊन त्यांना अरेस्ट करणं हे चुकीचं असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी त्या व्हीडिओ वरून प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर प्रश्न उपस्थित करताना तो एफबी लाईव्हचा व्हीडिओ डिलीट का केला असं विचारलं आहे. तसेच उगाचच सरकारचा वापर करून सरकारी यंत्रणांचा वापर करून खऱ्याचं खोटं किंवा खोट्याचं खरं करता येत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर हे सरकार असं दबाव आणून सोशल मीडियामध्ये आपला दरारा आणि दहशत पसरावी म्हणून म्हात्रे-सुर्वे प्रकरणाचा उपयोग करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.