राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला 7 वर्षानंतर जामीन मंजूर; काय आहे प्रकरण?
जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी त्यांना जामीन मंजूर केला आहे. तर त्यांची 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. कदम यांनी आज्जी बायम्मा गणपत क्षीरसागर यांच्या नावे दुग्धव्यवसाय करणेसाठी बेकायदेशीररित्या कर्ज मंजुरीचे आदेश काढले.
सोलापूर : बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरूंगात होते. त्यांना आता 7 वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी त्यांना जामीन मंजूर केला आहे. तर त्यांची 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. कदम यांनी आज्जी बायम्मा गणपत क्षीरसागर यांच्या नावे दुग्धव्यवसाय करणेसाठी बेकायदेशीररित्या कर्ज मंजुरीचे आदेश काढले. त्यानंतर ते कर्ज वितरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला आणि शासनाची तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची 6 लाख 36 हजार 658 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तर अनिल राघोबा म्हस्के यांनी 31 मे 2017 रोजी सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावेळी पोलिसांनी रमेश कदम यांना अटक केली होती.