माजी विरोधी पक्षनेत्यांनी काढली रोहित पवार यांची औकात, म्हणाले ‘ज्यांच्या घराणे नेहमी…’
आदित्य ठाकरे यांची दिशा भरकटलेली आहे. त्यांची दिशा सालियन प्रकरणामध्ये काय दिशा यायची ती येईल. आदित्य ठाकरे भरकटलेले आहेत. आता त्यांना दिशा सापडणार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना आमच्यासोबत आणली. त्यामुळे तिकडे उरलंय कोण?
मुंबई | 21 ऑक्टोंबर 2023 : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आमच्यात काय होतंय याची काळजी करू नये. तुम्ही तुमची काळजी करा. तुम्हीच बॉर्डरवर आहात. कारण, एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन भाजपसोबत आले. अजितदादा राष्ट्रवादी घेऊन आले. आता, अब की बारी कॉंग्रेसकी आनेवाली है. सावध राहा. विरोधी पक्षनेते पद सोडून जसे विखे आमच्यात आले. तसे, तुम्ही मंत्रिपद मिळवले नाही म्हणजे कॉंग्रेसने मिळवले, असा खरमरीत टोला माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला. रोहित पवार तुमचा जीव केवढा. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तीमत्व काय? तुम्ही बोलता काय? आपल्या औकातीत त्यांनी बोललेलं बरं. फडणवीस यांची प्रतिमा जनतेने पाहिली आहे. ज्यांच्या घराणे नेहमी खोट्याचे राजकारण केले त्याने नाकाने कांदे सोलण्याची गरज नाही, अशी टीका त्यांनी रोहित पवार यांच्यावर केली.
Published on: Oct 21, 2023 09:31 PM
Latest Videos