Talathi Recruitment : आज पासून होणार तलाठीपदासाठी परीक्षेला सुरूवात; 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान सुरू राहणार परीक्षा

Talathi Recruitment : आज पासून होणार तलाठीपदासाठी परीक्षेला सुरूवात; 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान सुरू राहणार परीक्षा

| Updated on: Aug 17, 2023 | 10:27 AM

अनेक दिवसांची प्रतिक्षा आता संपली असून प्रत्यक्ष तलाठीपदाच्या परीक्षेला सुरूवात आज पासून झाली आहे. तर 4.5 हजार पदासाठी 11 लाखांहून अधिक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.

मुंबई :17 ऑगस्ट 2023 | अनेक दिवसांची प्रतिक्षा लागलेली परिक्षा आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे पालकांसह उमेदवारांची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातील भूमी अभिलेख विभागाच्या तलाठी या पदासाठी आज पासून परिक्षा सुरू होत असून ती 14 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच ही परीक्षा तीन सत्रांत होणार असून सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 या दरम्यान पेपर होणार आहेत. त्याचबरोबर या परिक्षेसाठी राज्यभरातून 11 लाख 10 हजार 53 उमेदवारांनी फॉर्म भरला असून 4 हजार 466 जागांसाठी ही तलाठी परिक्षा होत आहे.

Published on: Aug 17, 2023 10:27 AM