Shiv Sena : नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Shiv Sena : नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची शिवसेनेतून हकालपट्टी

| Updated on: Jul 24, 2022 | 9:48 AM

नागपूर (Nagpur) ग्रामीणचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची देखील शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवाया केल्यानं शिवसेनेतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूर :  एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने सावध पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत अनेकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची देखील शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवाया केल्यानं शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.