शरद पवार यांच्या वयावरून राजकारण तापलं; फडणवीस यांचे आरोप; म्हणाले, ‘योग्य नाही...’

शरद पवार यांच्या वयावरून राजकारण तापलं; फडणवीस यांचे आरोप; म्हणाले, ‘योग्य नाही…’

| Updated on: Jul 08, 2023 | 9:09 AM

याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याचदरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्या वयावरून टोमणे मारणे सुरू आहेत. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्या वयावरून सुरू असणाऱ्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई : अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. तर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही दिसत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याचदरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्या वयावरून टोमणे मारणे सुरू आहेत. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्या वयावरून सुरू असणाऱ्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच त्यावरून त्यांनी आरोप देखील केलं आहे. यावेळी फडणवीस यांनी पवार यांच्या वयावरून त्यांच्या समर्थकांकडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा केला जात आहे असे म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार 100 वर्षे जगावेत. ते हवे तितके दिवस राजकारणात रहावेत असे म्हटलं आहे. तर त्यांच्या वयावरून सध्या त्यांच्या समर्थकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 08, 2023 09:09 AM