धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, अंनिसचे कार्यकर्ते अफवांना देणार तोंड

धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, अंनिसचे कार्यकर्ते अफवांना देणार तोंड

| Updated on: Jan 11, 2025 | 12:57 PM

अहिल्यानगर जिल्ह्यातील धामोरी गावात पसरलेल्या भुताच्या अफवेमुळे भीतीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि फोटो एडिट केलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) या अफवेचे खंडन करत आहे आणि अमावस्येला गावी राहून लोकांच्या भीती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन अंनिस आणि स्थानिक पोलिस पाटील यांनी केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील धामोरी गावात भुताची अफवा पसरल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते गावकऱ्याचं प्रबोधन करणार आहेत. अंनिसचे कार्यकर्ते अमावस्येला गावातच थांबणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील धामोरी ते सिन्नर तालुक्यातील शिरवाडे रस्त्यावरील नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसले. भुताने त्या चालकाला मारहाण केली अशा आशयाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ एडिट केल्याचं निरीक्षणाअंती स्पष्ट झालं. या व्हायरल घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने घेतली असून जगात भूत अस्तित्वात नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये अस आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलं आहे. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते अमावसेच्या रात्री सदर ठिकाणी राहून दाखवणार असून नागरिकांच्या मनातील भीती घालवण्याचे प्रयत्न करणार आहेत. ही अफवा असून रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये अस आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि धामोरी गावच्या पोलिस पाटील संगिता ताजणे यांनी केलं आहे.

 

Published on: Jan 11, 2025 12:57 PM