Income Tax Department notice to Anil Ambani| अनिल अंबानी यांना आयकर विभागाची नोटीस – tv9
अनिल अंबानी यांनी 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा नोटीसीत म्हटलंय. तसेच 814 कोटी पेक्षा अधिक रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेवरुन आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
देशातील प्रसिद्ध उद्योगमंत्री अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल अंबानी यांना आता आयकर विभागाची नोटीस बजावली आहे. तर अंबानी यांच्यांवर आयकर विभागाने तब्बल 814 कोटी रुपयांची माहिती लपवल्याचा ठपका ठेवला आहे. तर याबाबत अनिल अंबानी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर अनिल अंबानी यांची बहामास स्थित इकाई डायमंड ट्रस्ट आणि नॉर्दर्न एटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड या कंपनीतील आर्थिक भागीदार आहेत. या कंपनीची मिळकत आणि मालमत्ता ही त्यांच्या नावे असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. तर अनिल अंबानी यांनी 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा नोटीसीत म्हटलंय. तसेच 814 कोटी पेक्षा अधिक रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेवरुन आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 26, 2022 10:26 AM
Latest Videos