ठोस आणि संघर्षाची भूमिका घ्या, राष्ट्रवादीकडून आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न

ठोस आणि संघर्षाची भूमिका घ्या, राष्ट्रवादीकडून आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न

| Updated on: Jul 13, 2023 | 12:51 PM

अनेक आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश केला असून काही आमदारांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे. मात्र काही आमदारांनी आपली तटस्थ भूमिका घेत आपण फक्त पक्षाबरोबर असल्याचे सांगितलं होतं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या उभी फूट पडली असून अजित पवार आणि शरद पवार असे गट पडले आहेत. तर अनेक आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश केला असून काही आमदारांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे. मात्र काही आमदारांनी आपली तटस्थ भूमिका घेत आपण फक्त पक्षाबरोबर असल्याचे सांगितलं होतं. त्यामुळे हे आमदार कोणत्या नेतृत्वाकडे जायचं याच्या द्विधा मनस्थितीत आहेत. अशा आमदारांना आता पवार गटाकडून थेट निरोप पाठवण्यात आला आहे. त्या आमदारांना काठावर बसण्यापेक्षा एकत आत या अन्यथा निर्णय घ्या असं म्हणत गळ घालण्याचा प्रय्तन सुरू आहे. तर पवार गटात आणण्याचे प्रयत्न केला जात आहे. तर ठोस आणि संघर्षाची भूमिका घ्या, विचर करून कळवा असे सांगण्यात आलं आहे.

Published on: Jul 13, 2023 12:51 PM