बीएएमएस डॉक्टरची कमाल! अवघ्या 90 दिवसात कमवले 14 लाख; पाहा काय केलं त्यानं?

बीएएमएस डॉक्टरची कमाल! अवघ्या 90 दिवसात कमवले 14 लाख; पाहा काय केलं त्यानं?

| Updated on: Aug 12, 2023 | 12:49 PM

पण त्या बीएएमएस डॉक्टर युवकाने आपल्या व्यवसायातून नाही तर शेतात राबून हे 14 लाख रूपये कमावले आहेत. आपला व्यवसाय सांभाळून टोमॅटोच्या लागवडीतून 14 लाख रूपये मिळवणाऱ्या शेतकरी डॉक्टरचे नाव हे कपिल हत्ते असं आहे.

लातूर, 12 ऑगस्ट 2023 | पेशाने बीएएमएस डॉक्टर पण कमवले 90 दिवसात कमवले 14 लाख रूपये ऐकायला किती भन्नाट वाटतं ना? अनेकांना हा डॉक्टर असल्याने शस्त्रक्रिया करून कमावले असतील अशीच शंका येत असेल. पण त्या बीएएमएस डॉक्टर युवकाने आपल्या व्यवसायातून नाही तर शेतात राबून हे 14 लाख रूपये कमावले आहेत. आपला व्यवसाय सांभाळून टोमॅटोच्या लागवडीतून 14 लाख रूपये मिळवणाऱ्या शेतकरी डॉक्टरचे नाव हे कपिल हत्ते असं आहे. कपिल हत्ते हे परभणी येथे आपला वैद्यकीय व्यवसाय करतात. हा व्यवसाय सांभाळून त्यांनी उदगीर तालुक्यातल्या करडखेल येथे आपल्या वडिलोपार्जित शेती पैकी सव्वा एकरात टोमॅटोची लागवड मे महिन्यात केली होती. आता पर्यंत टोमॅटोची त्यांनी सहा वेळा तोडणी केलेली आहे. आणखी एक तोड होईल असं त्यांचे म्हणणे आहे. या टोमॅटोच्या लागवडीतून त्यांना 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बाजारपेठेचा अचूक अंदाज घेऊन त्यांनी हि लागवड केली होती. त्यामुळे त्यांना हा फायदा झाला आहे. तीन महिन्यात चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांनी युवकांनी भाजीपाला शेतीकडे वळावे असं आवाहन केले आहे.

Published on: Aug 12, 2023 12:49 PM