रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, दादांच्या बैठकीत तोडगा निघाला नाहीतर…; काय दिला आक्रमक इशारा?

| Updated on: Sep 08, 2024 | 2:35 PM

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू होते. रविकांत तुपकर यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केली. तर सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Follow us on

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सुरु असलेले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित झाले आहे. राज्य सरकारकडून रविकांत तुपकर यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत ११ सप्टेंबरला बैठकचे निमंत्रण देण्यात आले असून या बैठकीला जर तोडगा निघाला नाहीतर १२ सप्टेंबर पासून आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. यावेळी ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेण्याचं निमंत्रण दिलं तर कोणतीही आडमुठेपणाची भूमिका घेणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ११ सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. पण जर ११ सप्टेंबरच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास १२ सप्टेंबरपासून रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १०० टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू होते. बघा काय म्हणाले रविकांत तुपकर?