सरकारला १५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात…, रविकांत तुपकर यांचा निर्वाणीची इशारा काय?

| Updated on: Nov 30, 2023 | 10:49 AM

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतलंय. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या काही मागण्या मान्य, सरकारला १५ दिवसांची वेळ दिली आहे. मात्र त्यानंतर आम्ही थांबणार नाही, आणखी उग्र आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतलंय. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्यात तर काही मागण्या सरकारसोबत चर्चा करून मान्य करू असं आश्वासनही त्यांनी दिलंय. मात्र आंदोलन मागे घेत असताना रविकांत तुपकर यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. सरकारला १५ दिवसांची वेळ दिली आहे. मात्र त्यानंतर आम्ही थांबणार नाही, आणखी उग्र आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. एकीकडे ऊस दरासाठी राजू शेट्टी रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे रविकांत तुपकर यांनी स्वतंत्रपणे आंदोलन उभं केलंय. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. अशा नोटीशींना आपण भीक घालत नसल्याचे तुपकर यांनी म्हटलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 30, 2023 10:49 AM
मुख्यमंत्री शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?
मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात नेमकं काय घडणार?