Jayant Patil | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत, आता तात्काळ खातेवाटप करा, जयंत पाटील यांनी टोचले कान

Jayant Patil | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत, आता तात्काळ खातेवाटप करा, जयंत पाटील यांनी टोचले कान

| Updated on: Aug 09, 2022 | 6:03 PM

Jayant Patil | अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्याला मदतीची गरज आहे, त्यामुळे आता तात्काळ खातेवाटप करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil | अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे (Heavy Rain) राज्यातील शेतकऱ्यांची (Farmer) अवस्था बिकट झाली आहे. त्यांना तातडीने मदत पोहचवण्याची गरज आहे, त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion) मुहुर्त लागलाच आहेच तर हातासरशी खाते वाटप ही करुन टाका असा सल्ला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिला आहे. खातेवाटप केले तर पालकमंत्री नेमता येतील आणि शेतकऱ्यांना लागलीच मदत ही मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले. आपले सहकारी कोण आणि कसे असावेत हे निवडीचे स्वातंत्र्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा असल्याचा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. जर कोणी नाराज असतील अथवा कोणावर आरोप होत असतील तर कोणासोबत मंत्रीमंडळ स्थापन करण्यात आले हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा चॉईस असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. काही नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत, त्यामुळे या मंत्रीमंडळाची सुरुवात कशी झाली हे यावरुन स्पष्ट झाले.

Published on: Aug 09, 2022 06:03 PM