अन् खासदार सुप्रिया सुळे भारावल्या; नेमकं काय झालं पुण्याच्या भोर तालुक्यातील भेटीतं?
काही राजकारणी हे सामान्यांना आपलेसेही वाटणारे असतात. ते त्यांच्यात मिसळतात. कार्यकर्त्यांनी आज पर्यंत अनेक नेत्यांना मोठं मोठ्या महागड्या वस्तू या भेट म्हणून दिल्या आहेत. मात्र कोणी कार्यकर्त्यानं राजकीय नेत्याना एखादी साधी वस्तू दिली आणि ती मोठ्या मनाने घेतलेली क्वचितच काहींच्या बाबतीत घडतं.
पुणे : राजकारणी म्हणजे राजकिय सभा, बैठका आणि पंचतारांकित हॉटेल्स आणि अलिशान राहणीमान. पण यात सगळेच रमतात असे नाही. काही राजकारणी हे सामान्यांना आपलेसेही वाटणारे असतात. ते त्यांच्यात मिसळतात. कार्यकर्त्यांनी आज पर्यंत अनेक नेत्यांना मोठं मोठ्या महागड्या वस्तू या भेट म्हणून दिल्या आहेत. मात्र कोणी कार्यकर्त्यानं राजकीय नेत्याना एखादी साधी वस्तू दिली आणि ती मोठ्या मनाने घेतलेली क्वचितच काहींच्या बाबतीत घडतं. असंच खासदार सुप्रिया सुळे आणि पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भाग असलेल्या हिरडस मावळ खोऱ्यातील कार्यकर्त्यांच्या बाबत झालं आहे. येथे सुळे यांनी भेट दिली. गावाची पाहणी केली आणि लोकांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी सुळे यांना रानमेवा भेट दिला. डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंद आणि फणस शेतकऱ्यांनी सुळे यांना भेट दिला. शेतकऱ्यांची दिलेली भेट पाहून सुळे भारावल्या. तसेच दिलेल्या भेटीबद्दल सुळे यांनी शेतकऱ्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.