फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावर अडचणीचं मळभ? थेट ताफा अडवण्याचा शेतकऱ्यांचा इशारा? काय कारण?

फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावर अडचणीचं मळभ? थेट ताफा अडवण्याचा शेतकऱ्यांचा इशारा? काय कारण?

| Updated on: May 25, 2023 | 10:36 AM

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध विकास विकास कामांचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

सोलापूर : राज्यातील शेतकरी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच शेतमालाला योग्य बाजारभाव नाही. की त्यावर योग्य उपाय योजना नाही. तर अवकाळीचा चांगलाच फटकाही शेतीपिकाला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आता सय्यम सुटत चालला आहे. यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध विकास विकास कामांचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याचदरम्यान आता त्यांचा ताफा हा अडविणार असल्याचा थेट इशाराच शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या विविध मागण्या पूर्तता न केल्यामुळे अखिल भारतीय किसान सभा आक्रमक झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या खरीप, रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप शेतकर्‍यांना मिळाले नाही. त्यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत 385 कोटी रुपये शेतकर्‍यांना कारखानदारांकडून येणे बाकी आहे. तर नाशिकच्या लाँग मार्चला दिलेले आश्वासन अश्या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा आडवणार असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांनी दिला आहे.

Published on: May 25, 2023 10:36 AM