कितीही त्रास होत असला तरी…; लाँग मार्च मोर्चातील शेतकऱ्यांची तब्येत बिघडली
त्यादरम्यान काही शेतकऱ्यांची तब्बेतीत बिघाड झाल्याचे समोर आले आहे. तर त्यांना जवळच्याच रूग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका दाखल झाली.
नाशिक : शेतकरी त्यांच्या विविध मागण्या घेऊन शासन दरबारी येत आहेत. नाशिकवरून निघालेलं लाल वादळ शहापूर जवळील कळमगाव या ठिकाणी पोहचलं आहे. त्यादरम्यान काही शेतकऱ्यांची तब्बेतीत बिघाड झाल्याचे समोर आले आहे. तर त्यांना जवळच्याच रूग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका दाखल झाली आहे. या मोर्चात सहभागी झालेल्या दोन मोर्चेकरांना ताप आल्याने अशक्तपणा वाटू लागल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आपल्या मागण्यांसाठी 70 ते 80 किमोमीटर पायी चालल्याने रस्त्यावर चालताना दगड लागल्याने पायांना जखमा झाल्या आहे. मात्र कितीही त्रास होत असला तरी मुंबईकडे जाण्यासाठी ठाम असल्याचेही या मोर्चेकरिंनी त्यांचा निर्धार सांगितला आहे.
Published on: Mar 16, 2023 10:00 AM
Latest Videos