रावेर मतदार संघात सासरा विरुद्ध सून असा सामना रंगणार
रावेर लोकसभा मतदार संघातून आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असून राष्ट्रवादी पक्षाने देखील आपल्याला रावेर मधून लढण्यास सांगितल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या सून यांनी देखील आपण पक्षाने संधी दिली तर रावेरमधून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या लोकसभा मतदार संघात सासर विरुध्द सून असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
जळगाव | 31 डिसेंबर 2023 : जळगावातील रावेर लोकसभा मतदार संघात सासरा विरुद्ध सुन असा सामना रंगण्याची शक्यता आहे. आपण रावेर मतदार संघातून लढण्यास तयार आहोत. आणि पक्षानेही तसा निर्णय आपल्याला कळविला असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. रावेरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी सोडावी अशी मागणी आम्ही महाविकास आघाडीकडे केल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे पक्षाने संधी दिली तर पुन्हा एकदा लढणार असी खडसे यांची सून भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्याला डॉक्टरांनी परवानगी दिली तर आपण निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचे म्हटल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे जर सर्वकाही सुरळीत झाले तर रावेर लोकसभा मतदार संघात सासरा विरुद्ध सून असा सामना पाहायला मिळू शकतो.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया

तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
